Author Topic: नवनाथ पोथी वाचल्यावर ...  (Read 1821 times)

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
नवनाथ पोथी वाचल्यावर ...
« on: November 01, 2012, 07:53:34 PM »
नाथाप्रती प्रीती  मनात होती
जरी नव्हती  वाचली पोथी
कसला गूढ  असावा संकेत
नाही उमजत आज मज
वाचला पंथ  दडला कथेत
वरील उलटीत  रंजक प्रसंग
साधने विन  न मिळे ज्ञान
सद्गुरू वाचून  न होये सोय
मागील जन्माची  असून शिदोरी
या जन्मी परी  लागे कष्टावे
इतुके पक्के  ठसले मनात
झालो शरणागत  नाथापायी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: नवनाथ पोथी वाचल्यावर ...
« Reply #1 on: November 02, 2012, 10:02:17 AM »
ह्या जन्मी वाचनी
आली नाथांची पोथी
पुण्य आले कामी
मागील जन्मीचे   
 
व्हावे साधना ज्ञान 
हाच असावा संकेत
म्हणून वाचवली पोथी
नवं नाथानी.     
 
मिटो आता तळमळ 
भेटो सद्गुरू तत्काळ
हीच प्रार्थना निर्मळ
नाथांच्या पाई.   
 
 
श्री सद्गुरू समर्थ...
« Last Edit: November 02, 2012, 10:03:11 AM by केदार मेहेंदळे »

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: नवनाथ पोथी वाचल्यावर ...
« Reply #2 on: November 02, 2012, 06:17:43 PM »
खूप छान ,तथास्तु.

Offline shanu

 • Newbie
 • *
 • Posts: 12
 • Gender: Female
  • Me 1 kavi
Re: नवनाथ पोथी वाचल्यावर ...
« Reply #3 on: November 05, 2012, 02:16:59 PM »
 :)