Author Topic: ।। पंढरीचा राणा ।।  (Read 1157 times)

।। पंढरीचा राणा ।।
« on: November 07, 2012, 10:32:34 AM »
।। पंढरीचा राणा ।।

पंढरीचा राणा तिष्ठला कुणासाठी
वाट पाहूनि का थकला जगजेठी ।।

युगे अठ्ठावीस उभा तू विठ्ठल
कर कटिवरी ठेवूनि निश्चल ।।

भक्तांचे उमाळे तुज सोसवेना
म्हणूनि उभा का मिटूनि लोचना ।।

कुरूक्षेत्रावरी सांगूनि गीता ज्ञान
घालनिलेस तू पार्थाचे अज्ञान ।।

पावलो-पावली येथे जीवन संग्राम
झालासे का निष्ठूर सांग घनश्याम ।।

चंद्रभागेचा काठ खुणावतो तुज
भक्तांच्या ह्रदयीचे जाण हितगुज ।।

   - श्रीमति प्रतिभा गुजराथी

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: ।। पंढरीचा राणा ।।
« Reply #1 on: November 07, 2012, 12:13:36 PM »
jay jay pandurang hari

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
Re: ।। पंढरीचा राणा ।।
« Reply #2 on: November 16, 2012, 02:54:18 PM »
sundar, aavadli