श्रीकृष्ण! गेली पाच हजार वर्षे भारतीय स्त्रीपुरुषांच्या व्यक्त-अव्यक्त मनांचा तळठाव व्यापून दशांगुळे शेष उरलेली एक सशक्त विभूतिरेखा - एक युगपुरुष!
...
श्रीकृष्णाच्या मूळ जीवनसंदर्भांची मोडतोड न करता त्याचं 'युगंधरी' रूप बघता येईल का? त्याच्या स्वच्छ नीलवर्णी जीवनसरोवराचं दर्शन घेता येईल का? गीतेत त्यानं विविध जीवनयोग नुसतेच सांगीतले का? की हातच्या दिव्य, गतिमान सुदर्शनासारखे प्रत्यक्ष जगूनही दाखवले? त्याच्या जीवनसरोवरातील दाटलेलं शेवाळं तर्कशुद्ध सावधपणे अलगद दूर सारलं तर त्याचं 'युगंधरी' दर्शन शक्य आहे.
'मृत्युंजय'च्या यश:शील रचनाकाराची प्रदीर्घ चिंतन, सावध संदर्भशोधन, डोळस पर्यटन व जाणत्यांशी संभाषण, यातून साकारलेली साहित्यकृती - युगंधर!!