नारळीकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली ही पाचवी विज्ञान कादंबरी. विश्वाच्या अफाट पसार्यात पृथ्वी एक नगण्य बिंदू असली तरीही आतापर्यंतच्या खगोलशास्त्रीय पुराव्यानुसार ती जीवनसृष्टी नांदवणारे एकमेव स्थान आहे. हे लक्षात घेता सर्व विश्वातील जीवनसृष्टी टिकवण्याची जबाबदारी मानवावरच आहे; परंतु मानव ती कितपत सांभाळत आहे? दिवसेंदिवस ढासळत जाणारे पर्यावरणाचे संतुलन; सर्वसंहारक अण्वस्त्रांची वाढती स्पर्धा आणि साठा अशा गोष्टी काय दाखवतात? यामुळे नारळीकरांना आलेली अस्वस्थता त्यांच्या लिखाणातून प्रकट होते.