!!!! आधुनिक नव्या म्हणी !!!! भाग (१)
१) जयाअंगी खोटे पण, तया मिळे मोठेपण !!!!
२) सरकारी काम, दहा महिने थांब !!!!
३) प्रेमाच्या लग्नाला, वरात कशाला !!!!
४) घाल खादी, नि हो नेता !!!!
५) जयाअंगी मोठेपण, तया भेटणे कठीण !!!!
६) अभ्यासाचे प्रदर्शन, अन् लक्ष दूरदर्शन !!!!
७) रोगी सलामत तो, तपासण्या पचास !!!!
८) निवडणूक सरो, मतदार मरो !!!!
९) लाव पावडर, नि हो गोरी !!!!
१०)जावई बोले, सासरा डोले !!!!
११)दारूची तहान, हात भट्टीवर !!!!
१२)एकमेका कॉपी देऊ, अवघे होऊ उत्तीर्ण !!!!
१३)रजिस्टर लग्नाला, पंक्ती कशाला !!!!
१४)स्मगलिंग करून भागला अन् राजकारणाला लागला !!!!
१५)अति शहाणी तिची, पर्स रिकामी !!!!
१६)घाईत घाई अन्, चष्मा सापडत नाही !!!!
१७)ज्याचे काम मीठ, त्याच्याशी वागावे नीट !!!!
१८)हुंड्याची सून, तोंडाळ फार !!!!
१९)नाव सागर, डोक्यावर घागर !!!!
२०)डॉक्टर, वकील, तलाठी आप्पा, तुमचे दर्शन नको रे बाप्पा !!!!
२१)व्ही.आई.पी. मंडळी येत घर, हले दारचा कबरा !!!!
२२)लाच खाणार, त्याला सीबीआय नेणार !!!!
२३)चार दिवस बसपाचे, चार दिवस भाजपचे !!!!
२४)उठता लाट, बसता बुक्की !!!!
२५)घराला नाही दार अन्, म्हणे मी ईनामदार !!!!
२६)चमत्कार वाचून, नमस्कार नाही !!!!
२७)जन्मा आला हेला, पाणी वाहता वाहता मेला !!!!
२८)डोळ्यात केर, कानात फुंकर !!!!
२९)तोंडावर ओव्या, अन् मागे शिव्या !!!!
३०)तन खाई धन !!!!