Author Topic: पाऊस!!!  (Read 488 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 167
पाऊस!!!
« on: January 03, 2015, 08:03:22 PM »
पाऊस
उन्हाळ्याने जावे अन
पावसाळ्याने यावे
हिवाळ्याच्या थंडीवर का
 पावसाचे प्रेम व्हावे

उन्हाळ्यातल्या थंडीच्या लग्नाला
हिवाळ्याने नाही म्हटले
म्हणून पावसाने रागावून थंडीशी
 आंतर ऋतीय लग्न केले

हल्ली पाऊस ही
माणसारखे वागायला लागला
वर्षाचे Target वाटेल तेव्हा
 पूर्ण करायला लागला

-राजेश खाकरे


Marathi Kavita : मराठी कविता