Author Topic: विनोदी चारोळ्या - " लशी टोचल्या, चुंबकत्त्व आले "  (Read 54 times)

Offline Atul Kaviraje

  • Jr. Member
  • **
  • Posts: 286
मित्र/मैत्रिणींनो,

     कालच वाचनात एक बातमी आली होती की, महाराष्ट्रात एका सद्गृहस्थाने, कोरोना लशींचे दोन्ही डोस घेतल्यावर, त्यांच्या अंगी चुंबकत्त्व येऊन काटे, चमचे, किचन मधील इतर धातूच्या वस्तू त्यांचा बाह्य-शरीरावर सहज चिकटू लागल्या होत्या. सत्य पडताळून पाहण्यास अनिसने त्यांच्या घरी वर्णी लावून मुलाखतही घेतली होती.

     पण मला वाटत, यात अंधश्रद्देचा प्रश्नच उद्भवत नाही, हे निखालस शास्त्रच आहे, निमित्त एवढंच, की कोरोनाचे दोन्ही व्हॅक्सिन डोस घेतल्यावर, त्यांच्या शरीरात आधीच लपलेला हा चुंबकत्त्वाचा सुप्त गुण, उफाळून वर आला इतकंच. असो, काही खुमासदार चारोळ्या या विषयावर मला सुचल्या आहेत.

                          विनोदी चारोळ्या
                   " लशी टोचल्या, चुंबकत्त्व आले "
                   ----------------------------

१)  ख्याती मिळाली, प्रसिद्धी मिळाली
     कोरोनाची माझ्यावर मेहेर-नजर झाली
     हाडा-मासांचा साधा माणूस मी,
     चुंबक-माणूस म्हणून नावा-रूपास आलो मी.

२)  मला फळल्या कोरोना लशी म्हणून
     कूटूंबही धावले लस टोचण्या
     कुटुंब धावले म्हणून नात-लगही सरसावले पुढे,
     जग-भरात प्रसिद्धी अन नाव मिळण्या.

३)  नारळ,हार, उदबत्त्या पैसे घेऊन
     रीघ लागली घरापुढे माझ्या, भक्तांची
     याला आहे देवाचे वरदान, पडताळण्या,
     माणसे मुलाखत घ्यावया आली "अनिस " ची.

४)  माझ्यासह माझ्या फॅमिलीलाही मिळालंय
     चुंबकत्त्वाचे अनोखे चमत्कारिक वरदान
     गिनीज बुक वाले आले नाव नोंदण्या आणि पहाण्या,
     कॉमन मॅन चा झालेला मॅग्नेट मॅन.

५)  आमच्या वाडीला चांगला भाव मिळतोय आज
      जेव्हापासून मला  नाव - लौकिक मिळाला
      रॉयल्टीचे पैसेही घेतो मी न चुकता,
      माझ्या नशिबाने  हा  मान  मला  दिला .

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.06.2021-शुक्रवार.




 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा गुणिले पाच किती ? (answer in English number):