विश्व चारोळ्यांचे भाग (१)
१) इतकेही प्रेम करू नये की
इतकेही प्रेम करू नये की
प्रेम हेच जीवन होईल
कारण प्रेमभंग झाल्यावर
जिवंतपणी मरण येईल !!!!!
२) मी सुद्धा प्रेम केलं पण
मी सुद्धा प्रेम केलं पण
त्याचा खुलासा करू शकलो नाही
तिला स्वीकारायचं ठरवलं पण
तिचं हृदय जिंकू शकलो नाही !!!!!
३) प्रेम म्हणजे गवताचं
प्रेम म्हणजे गवताचं
एक नाजूक पातं असतं
हृदयाला हृदयाशी जोडणारं
एक पवित्र नातं असतं !!!!!
४) आता कुठेही जातो मी
आता कुठेही जातो मी
तिथे तूच दिसतेस
बागेतील फुलांतून
तूच हसतेस !!!!!
५) तुझ्या लक्ष्यात आले होते
तुझ्या लक्ष्यात आले होते
चोरून बघणे माझे
क्षणभरही नाही बघितले तू
एवढे कठोर मन तुझे !!!!!
६) मोगर्याचा वास घेताना
मोगर्याचा वास घेताना
गुलाब त्यांना समजू नकोस
मी फुल देत असताना
नाराज तू होऊ नकोस !!!!!
७) फुंकर घालताना अंधाराला
फुंकर घालताना अंधाराला
चांदण्याला दुखवू नकोस
पंख तुटल्या पाखरांना ,
पुन्हा आकाश दाखवू नकोस !!!!!
८) गुलाबांच्या पाकळ्यांचा पर्णसंचय
गुलाबांच्या पाकळ्यांचा पर्णसंचय
तुझ्या मनात साठव
मी प्रेम केले तुझ्यावर
आता एकदा तरी आठव !!!!!
९) तुझ्या आठवणीला सखे
तुझ्या आठवणीला सखे
वारंवार मी मनामध्ये चाळत होतो
सर्व दिवे विझून गेले तरी
एकटाच मागे मी जळत होतो !!!!!
१०) अंतरीचे दु:ख व्यक्त करताना
अंतरीचे दु:ख व्यक्त करताना
हृदय माझे भरून आले
जीवनाची व्यथा सांगताना
नयन अश्रू ढाळू लागले !!!!!
११) प्रिये कधी गं येशील तू ?
प्रिये कधी गं येशील तू ?
स्वप्नात कधी गं भेटशील तू ?
एकटाच राहीन मी असा
की जीवनात माझ्या येशील तू ?
१२) कुणासाठी मी जगतो
कुणासाठी मी जगतो
हे फक्त तिला माहित आहे
कारण हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर
फक्त एकच नाव आहे !!!!!
१३) सहवास संपल्यावर
सहवास संपल्यावर
उरतात त्या फक्त आठवणी
अखेर साक्षीला उरते
केवळ डोळ्यातील पाणी !!!!!
१४) दुसर्याला सुगंध देण्यासाठी
दुसर्याला सुगंध देण्यासाठी
थोडं तरी झिजून बघावं
दुसर्याचे दु:ख कळण्यासाठी
त्यांच्या सुखात भिजून बघावं !!!!!
१५) ढग गडगडतात पण
ढग गडगडतात पण
पाऊस पडत नाही,
मी तुझ्यावर प्रेम करते/करतो
पण म्हणू शकत नाही !!!!!