Author Topic: *** चारोळ्या ***  (Read 972 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
*** चारोळ्या ***
« on: October 25, 2013, 07:42:45 AM »
*** चारोळ्या ***
=================
तू दगडच बनून रहा
तुझ्यात देव पाहत राहीन
तुला कळलं नाही प्रेम तरी
तुझ्यावर प्रेम करत राहीन
=================
तुला पुसून टाकावं म्हणतो
माझ्या हृदयाच्या पटलावरून
हृदय तर तुझ्याजवळ आहे
ते कसं आणू मी चोरून
==================
तू खूपच भावनाशून्य
मी तितकाच भावनाशील
वाट बघतोय कधी पडेल
तुझ्या आतड्यांना पीळ
===================
तुझ्या प्रेमातल्या वेद्नांनाच
मी चांदण समजायला लागलोय
तू हो कितीही कठोर
त्यातच आनंद शोधायला लागलोय
======================
तुला विसरण्याआधी
मला विसरावं लागेलं
माझं अस्तित्व विसरून
मला जगावं लागेलं
====================
संजय एम निकुभ , वसई
दि. २५ . १० . १३ वेळ : ७.१५ स.     

Marathi Kavita : मराठी कविता