Author Topic: ** निरोप ** ==चारोळ्या **  (Read 2286 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
** निरोप ** ==चारोळ्या **
« on: August 31, 2013, 07:46:24 AM »
** निरोप ** ==चारोळ्या **
------------------------
तुझा निरोप घेतांना
जीवाची घालमेल होते
तुझ्या डोळ्यातही
विरहाची तगमग दिसते
---------------------------
पाऊल पुढे पडत नाही
तुझा निरोप घेतांना
कसे पाऊल पुढे टाकू
तुझ्या डोळ्यांत आस दिसतांना
-----------------------------
निरोपाची वेळ आल्यावर
तुझ्या डोळ्यात अश्रू जमतात
कसं सांगू प्रिये तुला
तेच माझी वाट अडवतात
------------------------------
निरोप घेतांना तुला मी
कधीच एकटक पहात नाही
तुझ्याकडे पाहिल्यावर
मला निरोप घेत येत नाही
-------------------------------
माहित असतं पुन्हा भेटू
तरी निरोप जाळतोच
प्रिया निघून गेल्यावरही
तो स्वतःला छळतोच
-------------------------------
असतो निरोप वेदनादायक तरी
त्यालाही सुखाची किनार असते
कारण निरोप देतांना पुन्हा भेटण्याची
मनात आस जागत असते
--------------------------------
मनात प्रेम असल्यावर
डोळ्यात नकळत अश्रू येतात
निरोप देतांना नेहमीच
सहज गालावर ढळू लागतात
---------------------------------
तुला निरोप देतांना
अश्रू पापण्यात लपवतो
तू हसत रहावीस म्हणून
ओठांवर हसू आणतो
---------------------------------
तुला निरोप दिल्यावरही
मी त्याच जागी उभा रहातो
तुझ्या पावलांच्या ठ्श्यामध्ये
तुला बघत रहातो
---------------------------------
हात सोडवत नाही तुझा
तुला निरोप देतांना
तो स्पर्श हवासा वाटतो
तू सोडून जातांना
---------------------------------
तुझ्या नजरेची भाषा
माझ्या मनाला कळते
म्हणून तुझा निरोप घेतांना
माझेही काळीज जळते
---------------------------------
हसत हसत निरोप देतो
तुला मी प्रत्येक वेळी
ते दृश्य आठवत रहातो
मी प्रत्येक सांजवेळी
----------------------------------
निरोप घेतांना तू हसल्यावर
मनातली वेदना नाहीशी होते
तुझा निरोपच सांगतो मला
तुझे अन माझे किती गोड नाते
------------------------------------
निरोप घेतांनाचा तुझा ओझरता स्पर्श
माझ्या मनात रेंगाळत रहातो
तो स्पर्शाचा गंधच तुला
माझ्या हृदयात ठेवत रहातो
=========================
संजय एम निकुंभ , वसई
दि. ३१ . ८ . १३  वेळ : ७ .०० स.     Marathi Kavita : मराठी कविता


Offline sweetsunita66

  • Full Member
  • ***
  • Posts: 862
  • Gender: Female
  • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: ** निरोप ** ==चारोळ्या **
« Reply #1 on: August 31, 2013, 04:07:33 PM »
 :) :) :)मस्त आहे,, पण ही कविता झाली ना ?  :) :)