" स्वप्नात तुझ रुप याव
मन माझ प्रेमान फुलुन जाव ,
तिथे शब्दानाही वाट नसावी
जीथे फक्त तु दीसावी,
हा तर माझा एक भास असावा
तोच माझ्या आठवणीचा एक क्षण असावा.! "
आनंद राजगोळे
प्रेम
प्रेम हे काय आसत
प्रेम हे मायेन भरलेला एक समुद्र
मायेन फुललेल एक फुल ,
दोन संगम पावणार्या विशाल नद्या ...!
आनंद राजगोळे
न उलघडणार कोडा आहे........
हे आता असेच चालायचे,
हे आता असेच चालायचे....
जितके दिवस माझ्या मनात तू आणि
तुझ्या मनात मी आहे...
कितीही प्रयत्न केला तरीही हे न
उलघडणार कोडा आहे........
संतोष नार्वेकर.........
लोकांना पक्क कळलय......
हल्ली नसते भास् होतात
तू बरोबर असल्याचे,
लोकांना पक्क कळलय
मला वेड लागल्याचे......
संतोष नार्वेकर.......
तू जवळ नसतानाही असल्याचे भास
तुझ्याच सहवासाची मनी आस
न जाणो असे का होते आजकाल
तुझ्याशीवाय वाटते सरे सारेच उदास
**** अमित वि. डांगे
कोण जाने का पण तो नेहमी सूटतच गेला......
आपल्या मैत्रीचा धगा मी नेहमी
बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला,
कोण जाने का पण तो
नेहमी सूटतच गेला......
संतोष नार्वेकर.......
मला ठाऊक होत
मला ठाऊक होत,
मला तुझी साथ इथ्पर्यन्ताच आहे,
म्हनुनच तर मी स्वतः ला
केंव्हाच सावरला होत.........
संतोष नार्वेकर.................
15/1/2009
प्रेमाच्या जाळ्यात अडकलं की
सारंच जग गुलाबी भासतं
मग तिच्या आणि त्याच्याशिवाय
कोणतंच जग अस्तित्वात नसतं
**** अमित वि. डांगे ****
खेळ आता जून झाले,
चन्द्र आणि चांदण्या
ह्यांचे खेळ आता जून झाले,
तुझ्या येण्याने गजबजलेल्या माझ्या शहराचे रस्ते
आता तुझ्या जाण्याने सुने झाले...
संतोष नार्वेकर...
१५/१/२००९
जुनाच खेळ होता तो लहानपणीचा
तरी हृदयाने आज ही तो जपलाय
तु माझी राणी आणि मी तुझा राज्या
हच भाव आज ही ह्रुदयात साठलाय
======================
ღ ღसुगंधღ ღ 15/1/09
पुन्हा नव्याने मांडायचो.........
तुला आठवत आपण
भातुकलीने खेलायचो,
सारखा सारखा डाव मोडून
पुन्हा नव्याने मांडायचो.........
संतोष नार्वेकर....
१६/०१/२००९
नसताना
तू बरोबर असताना
फक्त तुला पाहण
आणि नसताना तुझ्या सोबत
आठवनिंच्या हिंदोल्यावर झुलन.....
संतोष नार्वेकर.......
२६/०१/2009
अबोलीचे गंधही, किती मखमलीसे
तुझे रुप भासे मला मलमलीचे
आता काय बोलु परी अप्सरा की
अबोलीच जेव्हा, तुझ्यात भासतसे
संतोष (कवितेतला)
पडला कहर होता........
रस्त्या काठोकाठ श्रीमंताच्या
इमारतीचा बहार होता,
त्या इमारातिन्मागे गरिबांच्या
घरावर पडला कहर होता........
संतोष नार्वेकर....
२८/०१/२००९
गरिबांच्या घरातला बहर
उद्याचा कहर होता
नव्या सूर्य किरनाशी
हातात जहर होता
पोटाची भूक
कधी कधी पडत असे मग
दुपारच्या जेवणाची भ्रांत'
आणि करत होते ते पोटाची भूक
पानी पिउनी संथ...........
संतोष नार्वेकर.........
२९/०१/२००९