धीर देणारा संता

Started by Rahul Kumbhar, January 26, 2009, 02:38:59 PM

Previous topic - Next topic

Rahul Kumbhar

एक दिवस घाटातून जाणा - या एका बसला जोरदार अपघात होतो. त्या बसचं खूप नुकसान तर होतंच, शिवाय त्या प्रवाशांच्या जिवाचं आणि वस्तूंचंही प्रचंड नुकसान होतं. जख्मींपैकी एकाला शुद्ध येते आणि एकंदर परिस्थिती पाहून तो धाय मोकलून रडायला लागतो.
जख्मी : अरे देवा मी आता काय करू? या अपघातात माझा हात तुटलाय. माझ्या आयुष्याचं नुकसान झालं रे.
सन्ता लांब राहून अपघात पाहत असतो. त्या जख्मी माणसाचं दु:ख त्याला पाहवत नाही आणि तो धावत त्याच्या जवळ जातो.
सन्ता : अहो, असे रडू नका. हे पाणी प्या पाहू. कशाला एवढं रडायचं ते. आत्ता मदत पोहोचेल आपल्याला.
जख्मी : तुम्हाला कसं सांगू हो. या अपघातात पाहा माझा हातच तुटलाय. आता मी कोणाकडे पाहू.
सन्ता : अहो, असा धीर नसतो बरं सोडायचा. तो तिथे पडलेला माणूस पाहा. त्याचं तर डोकं तुटलंय. तरी बिचारा हूं की चू करत नाहीय.