मला आवडलेल्या चारोळ्या
चारोळी क्रमांक-229
------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
--नवं-चारोळीकार आज आपणास पुन्हा त्या आठवणी या चारोळीतून सांगत आहे . तो म्हणतोय , त्याच्या चारोळीतील प्रेयसी आपल्या प्रियकरास म्हणतेय , तुझे माझे तेव्हाचे प्रेम आता फक्त आठवणीतच उरलंय . आता फक्त तुझ्याच आठवणींवर मी जगतेय , दिवस काढतेय , दिवस ढकलतेय . हा आठवणींचा हिंदोळा आजही हेलकावत आहे . त्यावर आजही आपण दोघेही बसून झुलत आहोत . एकटी चालत असता , सोबत तुझ्याच आठवणी असतात . तुझ्या आठवणीत हरवून मी ही पाऊलवाट अगदी एकटीच , एकांतीच चालत असते .
===========================
💘 “आठवणीच्या हिंदोळ्यावर तुझे माझे भेटणे
एकांतीपावूल वाटेवर तुझ्या आठवणीतच माझे चालणे.”💘
===========================
--नवं-चारोळीकार
----------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-क्रिएटर मराठी.कॉम)
--------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.03.2023-शनिवार.
=========================================