मला आवडलेल्या चारोळ्या
चारोळी क्रमांक-232
------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
--नवं-चारोळीकार आज पुन्हा एकदा एक प्रेमाची चारोळी लिहीत आहे . तो म्हणतोय , त्याच्या चारोळीतील प्रेमी आपल्या प्रेयसीस म्हणतोय , की प्रिये , माझ्यासह तू असताना , मला तुझी सोबत असताना , जीवनात दुःख नावालाही फिरकणार नाही , फक्त सुखच सुख असेल . सुखांची अविरत बरसात माझ्या आयुष्यात जीवनभर होत राहील . प्रेमात मी आताच पडतोय , प्रेम म्हणजे नेमकं काय हे मला अजूनही कळलेलं नाही , माहित नाही . पण , ते जर तुझ्याइतकंच सुंदर असेल , तर मला ते प्रत्येक जन्मी हवंय , जन्मोजन्मी हवंय .
=================
तुझी सोबत असताना,
जीवनात फक्त सुखांचीच,
अविरत बरसात असेल
प्रेम काय आहे माहीत नाही,
पण ते जर तुझ्या इतकं सुंदर असेल
तर मला जन्मो जन्मी हवयं.🙇❤️
=================
--नवं-चारोळीकार
----------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-क्रिएटर मराठी.कॉम)
--------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.03.2023-मंगळवार.
=========================================