मला आवडलेल्या चारोळ्या
चारोळी क्रमांक-233
-----------------------
मित्र/मैत्रिणींनो,
--नवं-चारोळीकार आज या चारोळीतून पतीचे आपल्या पत्नीप्रती प्रेमाचे गुणगान आपणास दाखवीत आहे . तो म्हणतोय , त्याच्या चारोळीतील पती आपल्या पत्नीस म्हणतोय , बायको , तू जेव्हा माझा हात तुझ्या हाती घेशील तेव्हा तू निर्भय होशील . तुला मग कशाचीच भीती उरणार नाही . माझ्याबरोबर असताना तुला अंधारही उजेडासमान भासेल . अंधारातील काजव्यांचा प्रकाशही तुला सूर्यापेक्षा अधिक प्रखर भासेल . तुझ्यावर मी इतकं प्रेम करतोय , की तुझा सहवास मला माझ्या आयुष्यात एक मार्ग दाखवेल . आपल्या दोघांचाही संसार नभात फुललेल्या चांदण्यांसारखाच फुलतं राहील . तो दिवसाही असाच फुलेल आणि रात्रीही .
===================
Dear Bayko..
हातात हात घेशील तेव्हा
भिती तुला कशाचीचच नसेल
अंधारातील काजवा तेव्हा
सूर्यापेक्षा प्रखर दिसेल
सहवासात तुझ्या,
आयुष्य म्हणजे,
नभात फुललेली चांदणरात असेल.🌃❤️
===================
--नवं-चारोळीकार
----------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-क्रिएटर मराठी.कॉम)
--------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.03.2023-बुधवार.
=========================================