मला आवडलेल्या चारोळ्या
चारोळी क्रमांक-234
-----------------------
मित्र/मैत्रिणींनो,
--नवं-चारोळीकार आज प्रेमातल्या उदाहरणांची आणि उपमांची आणि विशेषणांची भरमार या चारोळीत वापरत आहे . या चारोळीतील कथित प्रेमी आपल्या प्रियेचं मन कसं कसं राखतोय , हे अतिशय उत्तम रित्या चारोळीकार सांगत आहे . चारोळी वाचा , आपल्याला खूप मजा येईल .
==================
मी मागे नसतानाही,
असल्याचा भास होतो ना तुला!
लोकांशी महत्वाचं बोलतानाही
माझा जोक आठवतो ना तुला!
आपण गर्दीत चालतानाही,
माझ्यासोबत एकांत जाणवतो ना तुला!
इतरांसोबत जोरात हसतानाही,
माझा दुरावा रडवतो ना तुला!
कधी उदास वाटतानाही,
माझा चेहरा हसवतो ना तुला!
तुला नको असतानाही,
माझा आवाज लाजवतो ना तुला!
तू शब्दांनी नाकारतानाही
चेहराच सांगतो ना
मी आवडतो तुला!🥺❤️
==================
--नवं-चारोळीकार
----------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-क्रिएटर मराठी.कॉम)
--------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.03.2023-गुरुवार.
=========================================