मला आवडलेल्या चारोळ्या
चारोळी क्रमांक-235
-----------------------
मित्र/मैत्रिणींनो,
--नवं-चारोळीकार आज एक प्रेमाची गूढ चारोळी आपणास ऐकवीत आहे . तो म्हणतोय , त्याच्या चारोळीतील प्रियकर त्याच्या प्रियेस म्हणतोय , की मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलंय . प्रेम म्हणजे काय मला हे पुरेपूर समजलंय . त्यामुळे इतर गोष्टींचे मला आता काहीच भय उरले नाही . मला प्रेमाने इतकं तयार केलंय की मी माझ्या मनानेही तयार झालोय . मी कुठेही राहण्यास तयार आहे , मला चंद्र , चांदण्यांची काहीही गरज नाही . मी चांदण्यांत राहणारा नाही . मी कुठल्याही गोष्टींनाही आता घाबरत नाही . मला आता कुठलेच भय उरलेलं नाही . आणि खरं सांगू , तू जरी माझ्याबरोबर असलीस किंवा नसलीस तरीही या प्रेमामुळे मी तुला कधी विसरणेही शक्य नाही .
===================
चांदण्यात राहणारा मी नाही,
भीतींना पाहणारा मी नाही
तू असलीस नसलीस तरीही
शून्यात तुला विसरणारा मी नाही.🥰🤞🏼
===================
--नवं-चारोळीकार
----------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-क्रिएटर मराठी.कॉम)
--------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.03.2023-शुक्रवार.
=========================================