मला आवडलेल्या चारोळ्या
चारोळी क्रमांक-237
-----------------------
मित्र/मैत्रिणींनो,
--नवं-चारोळीकार या चारोळीतून नवऱ्याला बायकोबद्दल वाटणारे प्रेम आपणापुढे विशद करीत आहे . तो म्हणतोय , त्याच्या चारोळीतील नवरा आपल्या लाडक्या बायकोस म्हणतोय , अगं संसारात भांडणे ही होत असतातच . परंतु मी तुला आजवर कितीही बोललो तरीही तू ते सर्व ऐकूनच घेत होतीस . मला तू कायमचं समजून घेत होतीस . हा तुझ्या मनाचा मोठेपणाच आहे . तू आहेस म्हणून मीही आहे . तू आहेस म्हणून माझ्या जीवनाला एक अर्थ आहे . तू नसतीस तर माझे जीवन जणू व्यर्थच होतं .
=====================
🤩🤩बायको, बायको लाडाची बायको
कितीही बोललो तरी घेते कायम समजून
तू आहेस म्हणून आहे माझ्या जीवनाला अर्थ
तू नसशील तर माझे जीवन आहे व्यर्थ..
=====================
--नवं-चारोळीकार
----------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-क्रिएटर मराठी.कॉम)
--------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.03.2023-रविवार.
=========================================