Author Topic: होळी-रंगपंचमी-चारोळ्या-3  (Read 162 times)

Offline Atul Kaviraje

  • Hero Member
  • *****
  • Posts: 9,386
                                     होळी-रंगपंचमी
                                    --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०३.२०२३-मंगळवार आहे. आज रंगपंचमी आहे. चला तर साऱ्यांनी प्रेमाच्या रंगात रंगून जाऊन एकमेकांना रंग लावूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना रंगपंचमीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, तर रंगपंचमीच्या काही चारोळ्या--

               होळी चारोळी-रंगपंचमी मराठी चारोळी --

=========================================
मला रंग लावला तरी,
आता सगळे रंग फिके आहे,
तिच्या प्रेमाच्या गडद गुलाबी रंगात
मी आधीच रंगलो आहे...

___________________________

रंग पंचमीचे रंग
एकामेकांत मिसळतात
वेगळे असूनही माणसाला
एकीचे महत्व सांगतात..

___________________________

ही होळी करुया साजरी
आनंदाचा डोहात न्हाऊन
ओंजळ भर संसार सुख
अन् माणूसकीने रंगवून...

___________________________

रंग उत्सवांचा सजवुनी,
बांधुया दोरी नात्यांची.
चला साजरी करुया,
उत्सवांची रंगपंचमी..!!

___________________________

गजबजले आयुष्य माझे
सरड्याच्या गडद रंगांनी
हे होळीचे रंग फिके त्या पुढे..

___________________________

आला फाल्गुन मास
पेटवा होळी रे होळी
भरवा सजना घास
पुरण पोळी रे पोळी...
=========================================

--मराठी कन्टेन्ट
---------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी कन्टेन्ट.कॉम)
                   --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.03.2023-मंगळवार.
========================================= 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पन्नास गुणिले पाच किती ? (answer in English):