Author Topic: काही चारोळ्या -- <3  (Read 1735 times)

Offline madhura

 • Jr. Member
 • **
 • Posts: 271
 • Gender: Female
 • I am Simple
काही चारोळ्या -- <3
« on: September 24, 2013, 11:29:01 PM »
असावी तुझ्या माझ्या
प्रेमाची सुंदर अशी गोष्ट...
एकमेकांच्या डोळ्यांमध्ये
ती दिसावी स्पष्ट...
---------------

या हजारोंच्या गर्दीत
असा एक मित्र हवा....
खांद्यावर हात ठेवून म्हणेल
खाबरु नको भावा....

-----------------------------------
प्रेम म्हणजे काय नेमकं
हे अजूनही मला कळत नाही...
मी प्रेम दिलं तरीही समोरुन
परत कधी मिळत नाही...

-----------------------------------

मैत्रिण असावी तुझ्यासारखी
आपलेपणाने सतावणारी...
रागावलास का? विचारुन,
तरीही परत परत चिडवणारी...

------------------------------

जमतं कधीकधी मला ,
थोडं थोडं हसायला...
काळजावर दगड ठेऊन ,
जगासमोर नाचायला...
-----------------------------------

चूकून तरी एकदा ,
सूख यावे जवळ माझ्या...
विचारावे त्याला,
का रे असतोस दूर असा?...

----------------------------------

हे दुःख मला ,
नेहमीच छळतं...
एक गेलं की ,
दुसरं लगेच घेरतं...

-----------------------------

मनात दुःख इतकं की,
सूखाला जागाच नाही उरत...
म्हणूनच सूख आलचं तर,
ते निघून जातं परत..

-------------------------------

भेटणारे सगळेच शेवटपर्यँत
साथ देत नाही...
निघून गेलेला कधीच
आपला राहत नाही...

-------------------------------

ह्रदय माझं हल्ली थोडं
वेड्यासारखं वागतं
तू ह्रदयात असतेस तरीही
बाहेर शोधायला लागतं

----------------------

या आठवणीही माझ्यासोबत
असा काही खेळ खेळतात....
तुझ्या आठवणींना लपवून
'आता शोध' म्हणतात...

------------------------

माझी कविता आजकल
तुझ्यावर बनत नाही...
बनली जरी, त्यात तू
मात्र बसत नाही...

---------------------

जीच्याकडे पाहताना मन
माझे हरवून जाई...
तुलासोडून अशी कोणी,
दिसली अजून नाही...

---------------------

पाऊस येताच वाटतं
तूही त्याच्यासोबत यावीस...
चिंब भिजलेली तू अलगच
माझ्या मिठीत शिरावीस...

------------------------
बघ आज सये पाऊसाला
कसा उधाण आलाय...
माझ्या मिठीत येण्याचा
तूलाही बहाणा मिळालाय ...
------------------------


-- Unknown

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: काही चारोळ्या -- <3
« Reply #1 on: September 26, 2013, 01:25:52 PM »
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम