Author Topic: विरह---चारोळ्या  (Read 1541 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
विरह---चारोळ्या
« on: August 13, 2013, 08:30:13 PM »
***** विरह---चारोळ्या *****
=================
जितकां तुझा विरह
मला छळत रहातो
तितकां तुझ्या प्रेमात
मी पडत रहातो .
--------------------
विरह सुंदर असतो
केव्हाही प्रेमासाठी
तोच प्रेम फुलवतो
बांधतो पक्क्या गाठी
--------------------
तुझा विरहच तर
तुझ्यात गुंतून ठेवतो
प्रत्येक क्षणी मनात
तुलाच घेऊन फिरतो
--------------------
तुझा विरह कधी
मला वेडापिसा करतो
तुझ्यावरच प्रेम
त्याच्या आरशात दावतो
--------------------
तुझ्या विरहानचं तर
तुझ्यावरच प्रेम फुलवलं
नाही जगू शकत तुझ्याशिवाय
माझ्या मनाला पटवलं
--------------------- 
कधी कधी जाणीवपूर्वक
तुझ्या विरहात मी जळतो
माझ्या खऱ्या प्रेमाला
तावून सुलाखून घेतो
-------------------------
यातना होतात तरी मनाला
तुझ्या विरहास मी सोडत नाही
कारण त्याशिवाय माझ्या कवितेला
शब्द सखे मिळत नाही
-----------------------------
संजय एम निकुंभ , वसई
दि. १३ . ८ . १३  वेळ : ८.०० रा .       

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
Re: विरह---चारोळ्या
« Reply #1 on: August 17, 2013, 09:19:12 AM »
अप्रतिम राव एकदम मस्तच