Author Topic: अबोला  (Read 936 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
अबोला
« on: August 20, 2013, 11:11:42 PM »
ती सोबत नसल्यावर
खूप खूप बोलणं होतं
ती समोर आल्यावर
शब्दांच हरवणं होतं
=============
वेड्यासारखी बडबड तुझी
सतत चालू असते
भेटल्यावर कां तू
अबोल होत असते
----------------------------
तुझा अबोलाच तर
तुझा करून टाकतो
मनातले भाव तुझ्या
मला सांगून टाकतो
-----------------------------
संजय एम निकुंभ , वसई
दि. २०.८.१३ वेळ : १०.४५ रा . 

Marathi Kavita : मराठी कविता