Author Topic: विरह =चारोळ्या  (Read 1512 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
विरह =चारोळ्या
« on: October 04, 2013, 10:30:59 PM »
विरह =चारोळ्या
============
कितीही ठरवलं तरी
मन तुला विसरत नाही
डोळ्यांत पाणी आल्याशिवाय
माझी रात्रही सरत नाही
-------------------------------
डोळे लावून गुपचूप
मी पडून राहतो
रात्रभर तुझा चेहरा
पापण्यात पहात राहतो
-------------------------------
आसवे ओघळतात गालावर
तुझी आठवण सलत राहते
रात्र माझ्यासोबत जागून
हुंदके देत रडत रहाते
-------------------------------
नको रे आसवे गाळूस
हि रात्र मला समजावते
स्वतः मात्र आठवणीत
तुझ्या जागत रहाते
--------------------------------
किती प्रेम करतो तुझ्यावर
या रात्रीलाही माहित झाले
माझ्या डोळ्यातल्या अश्रूंनी
तिचे अंगण ओलेचिंब झाले
--------------------------------
मी आणि रात्र
दोघे सोबत जागतो
ती पहाटेची वाट बघते
मी तुझ्यासाठी झुरतो
--------------------------------
रात्रीच मिळतो एकांत
तुझ्यासोबत जागायला
जगाला न कळता
तुला डोळे भरून पहायला
--------------------------------
संपूर्ण रात्र माझी
तुझ्या आठवणीत सरते
पापण्या फक्त लवलेल्या
नीज कुठे जवळ करते
--------------------------------
रात्रीचं आणि तुझं
घट्ट नातं जुळलंय
दोघांइतकं कुणी
मला आजवर छळलंय
=====================
संजय एम निकुंभ , वसई
दि. ४ . १० . १३ वेळ : ८.५० रा.

Marathi Kavita : मराठी कविता