Author Topic: कोजागिरी ----चारोळ्या  (Read 961 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
कोजागिरी ----चारोळ्या
« on: October 19, 2013, 07:37:27 AM »
कोजागिरी ----चारोळ्या
=================
माझ्या कोजागिरीचा चंद्र
तूच तर आहेस
हा दिवस सरून जाईल तरी
तू व्यापून रहाणार आहेस
====================
तू जेव्हा भेटतोस तेव्हा
माझी कोजागिरीच असते
तुझ्या चेहऱ्यात पूर्ण चंद्राचे
प्रतिबिंब मी बघते
---------------------------------
कशासाठी हवे तुला
कोजागिरीचे बहाणे
प्रेम करतोस सांग ना
कां घेतोस उखाणे
--------------------------------
तुझ्या नजरेत पाहिल्यावर
कोजागिरीचा चंद्र दिसतो
तू माझ्यात डोकावतांना
तेवढाच शांत असतो
--------------------------------
कोजागीरीसाठी तू
मला बोलावणं केलं
तुझं प्रेमपत्रच आलं
मनास वाटून गेलं
-------------------------------
आज कोजागिरीच्या रात्री
तुझं प्रेम कबूल करणारं आहे
शब्दांच्या जाळ्यात पकडून
तुझी कबुलीहि घेणार आहे 
---------------------------------
संजय एम निकुंभ , वसई
दि. १९ . १० . १३  वेळ : ७ . २० स.     
 

Marathi Kavita : मराठी कविता