1.
हे वयच असं असतं,
स्वप्नांमध्ये हरवुन जायचं,
कुणीतरी आपलं ही असेल,
म्हणत वाट पहायचं.
****************************
2.
आतुर झाली आहे,
मी तुला भेटायला,
नुसतं स्वप्नांत नाही,
तर प्रत्यक्षात बघायला.
****************************
3.
येईल जेव्हा तो आयुष्यात माझ्या,
असेल क्षण तो कीती वेगळा,
गरजेल मेघ व पडतील धारा,
होतील जेव्हा अनावर भावना.
****************************
4.
हातांमध्ये हात गुंफ़ूनिया,
बसुया सागरी किना-यावर,
विसरुन सा-या दुनियेला,
प्रेम करुया एकमेकांवर.
****************************
5.
तुझ्याकडे मी पाहिल्यावर,
माझी मी राहत नाही,
मी मग तुझीच होते रे,
पण तुला ते कळत कसं नाही.
****************************
6.
चिंम्ब पावसात भिजताना
सारखी तुझी आठवण येते,
तू जवळ नसतांनाही
ती मायेची एक उब देते.
****************************
7.
नाजूक माझ्या ह्रदयाला
नेहमीच तू फुलासारखं जपतोस,
तुझ्या मैत्रीच्या सहवासात
कोमेजलेल्या मनालाही फुलवतोस.
******************************
8.
तुझ्यापेक्षा तुझ्या आठवणींच येवून
मला जास्त छळतात,
आसवांच्या दरीत बुडवून
नंतर विरहाच्या अग्नीत जाळतात.
*********************************
9.
मी तुझ्याकडे पाहिल्यावर,
डोळ्यांत माझ्या अश्रू जमा होतात,
इतका कसा रे तू बदललास,
मनाला माझ्या खुप जखमा होतात.
****************************
10.
नाही आवडत मला आता
तुझं परक्यांसारखं वागणं,
सोडून दिलयं मी हि आता
सारखं तुझ्यामागे धावणं.
****************************
11.
त्या वळणांवर जाणे
मी दिले तेव्हाच सोडून,
अश्रुंचा हा महापुर
गेला जेव्हा ओसरुन.
****************************
12.
एखाद्याने कितीहि नाही म्हंटलं
तरी आठवनी येतच राहतात,
आणि आपल्या मूक विश्वात
अचानक गोंधळ माजवून जातात.
****************************
13.
माझ्या भावनांचा संहार त्याला
दाखवुन कधिहि कळणारा नव्हता,
कारण त्या द्रुष्टीने तो कधिहि
माझ्यात तेवढा गुंतलेलाच नव्हता.
****************************
14.
तु का असाच नेहमी
मला शब्दांत अडकवतोस,
मला तुझी खरी गरज असते
तेव्हा दुरच निघून जातोस.
********************
15.
तुझ्या आठवनींचा आता
मला आलाय कंटाळा,
डोळ्यांतील अश्रुं ही जणू
लागलेत हळुहळु गोठायला.
********************
16.
तुझ्यावर विश्वास ठेवून
मी पुन्हा नाही फसणार,
डोळे उघडे ठेवूनच आता
प्रत्येक पावुल उचलनार.
**********************
17.
हसणंही आता का कोण जाणे
खूपच कठीण वाटायला लागलयं,
दुखांच्या काट्यांनी माझं काळीज
घायाळ व्हायला लागलयं.
****************************
18.
आयुष्याच्या प्रत्येक वळणांवर
नजर तुलाच शोधत आहे,
अपूर्ण स्वंप्नातही मी अजून
का रे तुलाच बघत आहे.
****************************
19.
तुझ्यापेक्षा तुझ्या आठवणींच येवून
मला जास्त छळतात,
आसवांच्या दरीत बुडवून
नंतर विरहाच्या अग्नीत जाळतात.
*********************************
20.
माझ्या मनातील भावना
कधी तुला कळल्याच नाही,
प्रितीच्या सुगंधी कळ्या कधी
तुझ्याही ह्रदयात उमलल्याच नाही.
*****************************
21.
आयुष्य तेच आहे,
आपण तरी का स्वत:ला बदलायचे,
कुणी काहीही म्हणू देत,
आपण आपल्या मनाप्रमानेच जगायचे.
****************************
22.
काय वर्णु महती
मी तुझ्या रुपाची,
बघ झालोच फिदा
मी तर त्याच्यावरती.
****************************
23.
अखेरपर्यंत जळनेच बहुतेक
लिहिले आहे माझ्या नशिबात,
कोणासाठी कितीही काही केले तरी
दरवेळी उपेकक्षाच माझ्या पदरात.
*********************
24.
चार ओळी मिळून
एक चारोळी बनते,
मनातलेच आपल्या सर्वकाही
तिच्यात सामावले असते.
**********************
25.
मी आहे राजकुमारी
माझ्या स्वप्नातल्या जगाची,
जिथे चालते हुकुमशाही
नेहमीच माझ्या मनाची.
**********************
26.
ठरवलंय मी ही आता
जशास तसे वागायचे,
कुणी वाकड्यात शिरलं की
सरळच त्याला करायचे.
**************************
27.
आयुष्याचा वैताग आल्यावर
जगणंच नकोसं वाटतं,
मरणाची वाट पाहिल्यावर
ते ही पाठच दाखवून जातं.
***************************
28.
काही माणसं अशीच असतात
आपुलकीचा आव आणतात,
समोर गोड बोलतात आणि
मागून पाठीत वार करतात.
************************
29.
जाणून आहेस सारेकाही
तरीही का हा दुरावा,
जिवघेणा वाटतो ग सखे
मला तुझा हा अबोला.
***********************
30.
कशाला वाचून राशीचक्र
उगाच भविष्य जाणायचं,
सोडून उद्याची चिंता
वर्तमानात मजेत जगायचं.
***********************
31.
मीच आता माझं
पुढचं आयुष्य घडवणार,
कोणाच्याही सोबतीशिवाय
पुढे चालायला शिकणार.
********************
32.
माझ्या आयुष्यातील तुझं अस्तित्व
नाही ठरवू शकत दुसरं कुणीही,
कारण आपल्यामधील मैत्रीचं नातं
नाही पोकळ इतकंही.
- संतोषी साळस्कर.