Author Topic: अबोला  (Read 1088 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
अबोला
« on: April 22, 2014, 07:16:50 PM »
एका मित्रान सांगितलं कि अरे ती दोन दिवस
अबोला धरून आहे एखादी चारोळी पाठव …
मग काय गाडी सुसाट सुटली अन अबोल्यावरती
ह्या चारोळ्या पाठवल्या त्याला … कशा ते सांगा
==============================
तू अशी उदास का
तू अशी अबोल का
माझ्या मनाची व्यथा
तुझा रुसवा जाणेल का
===============
तू अबोल असलीस तरी
मन तुझाच विचार करतं
तुझा रुसवा घालवू कसा
याच विचारात मग्न असतं
================
दोन दिस होऊन गेले
तू अबोला सोडेना
सखे तुझ्याविना मन
कशातही रमेना
================
तू अबोला धरलास
माझी झोपच उडून गेली
माझी प्रत्येक रात्र
माझ्या मनास रडवून गेली
=================
तू अबोला धरलास तर
या मनानं कसं जगावं
तू बोलली नाहीस तर
या काळजान कसं हसावं
------------------------------
सोड प्रिये रुसवा आता
नको अशी अबोल राहूस
या प्रेमवेड्या जीवाचा
अंत तू पाहू नकोस
==================
तू अबोल राहिल्यामुळे
तुझ प्रेम कळून आलं
खूप गहिर प्रेम करतेस
या काळजास कळून गेलं
===================
तू जितकी अबोल राहशील
माझी आठवण येत राहिलं
रात्र माझीच नाही तर
तुझीही जागीच राहिलं
===================
इतका अबोला धरू नकोस
श्वास माझा कोंडतो आहे
खरचं चुकलो गं मी 
माझ्याशीच भांडतो आहे
===================
प्रत्येक क्षण तुझा अबोला
मला जाळत रहातो
कधी साद घालशील
याची वाट पहात राहतो 
====================
तू अबोला धरल्यावर
काय करावे सूचत नाही
तुझा रुसवा घालवू कसा
तेच मनाला कळत नाही
===================
तू अबोला सोडण्यासाठी
मलाच मौन सोडावे लागेल
चूक नसली तरी
मलाच माफी मागावी लागेल
====================
तुझ्याकडे एकटक पाहिल्यावर
तुझा अबोला पळून जातो
कितीही असलीस रागावलेली
तुझा रुसवा गळून जातो
====================
सगळं जगणं व्यर्थ ठरतं
तू अबोला धरल्यावर
मन उंच नभांत उडतं
तू दोन शब्द बोलल्यावर
====================
नाही परवडत तुझा अबोला
मन घाबरून जातं
तुझी साद ऐकण्यासाठी
कासावीस होऊन जातं 
====================
तू राहिलीस जरी अबोल
कधीतरी माझ्या भावना कळतील
मी घालतच राहीन साद तुला
मग तू हि साद घालशील
====================
संजय एम निकुंभ , वसई
दि . २१.४.१४ वेळ ११.३० रा .
   
« Last Edit: April 28, 2014, 08:43:58 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता