Author Topic: प्रेमातल्या चारोळ्या  (Read 1930 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
प्रेमातल्या चारोळ्या
« on: August 04, 2014, 08:14:44 PM »
प्रेमातल्या चारोळ्या
======================
प्रेम व्यक्त करण्यापूर्वी
प्रेमाचा अर्थ स्वतःस कळायला हवा
एकदा पुढे केलेला हात
आयुष्यभरची साथ व्हायला हवा
=====================
हेच खर प्रेम आहे कां
हे स्वतःच्या मनाशी भांडून घ्यावं
वाटलं नाही जगू शकत याशिवाय
तरच प्रेम व्यक्त करावं
=====================
प्रेम व्यक्त करणं खूप सोप्पं
पण निभावण मात्र कठीण असतं
प्रेमाला दोषांसकट स्वीकारलं
तरच प्रेम टिकत असतं
=====================
प्रेम नशा , प्रेमातलं जगणं
खरचं खूप सुंदर असतं
प्रेमात शरीरापेक्षा मनांच
गुंतणं खूप गरजेचं असतं
=====================
स्वतःच अस्तित्व विसरून
प्रेमात वहात रहायला हवं
तेव्हाच दिसतं प्रेमाच्या अंतरंगातल
रूप नित्य नव नवं
=====================
प्रेम सुंदरच असतं
त्यास अपेक्षा अन स्वार्थ आड येतो
स्वतःचा अहंकार गोंजारला की
तोच प्रेमातला पहाड होतो
=====================
प्रेमात फक्त देणं असावं
प्रेमाचं सुख नजरेत असावं
काहीतरी मिळायला हवं
याच भान मनास नसावं
=====================
मनानं मनावर केलेलं प्रेम
कधीच तुटू शकत नाही
एक काळीज दुसऱ्या काळजाला
घावं देऊ शकत नाही
=====================
कधीच स्पर्श नाही केला
शरीर रुपी मी प्रेमाला
कां जाणे तो भाव कधी
शिवला नाही माझ्या मनाला
=====================
मी फक्त प्रेम करीत गेलो
कविता आपोआप सुचत गेल्या
मी कुठे काही लिहिलं
प्रेमानं साऱ्या लिहून घेतल्या
=====================
संजय एम निकुंभ , वसई
दि. ४. ८. १४ वेळ : ७. ०० स .

Marathi Kavita : मराठी कविता


Jawahar Doshi

  • Guest
Re: प्रेमातल्या चारोळ्या
« Reply #1 on: September 13, 2015, 12:47:05 PM »
Sarvach charolya atee sundar. Mastach...