Author Topic: चारोळी तिच्या नजरेतून ..  (Read 833 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
चारोळी तिच्या नजरेतून ..
« on: November 09, 2014, 10:09:09 PM »
चारोळी ..

*********************

अलगद तुझ्या ओंजळीत
मला प्रेम माझे वाहू दे ..!!
काय असते वाट प्रेमाची
तुझ्या डोळ्याने ती पाहू दे  ..!!

वारा होईल रे तुझी मी
सुगंध हि तु होऊन बघ ..!!
मिसळून जाईल तुझ्यात रे
एकदा माझा होऊन बघ ..!!

नुसतच नजरेनं बोलू नको रे
शब्दांना कधीतरी छेडत जा ..!!
हलका नकळत स्पर्श काय करतो
हक्काने कधीतरी ओढत जा ..!!

डोळ जरी बंद केले तरी
नजरे समोरून तु जात नाही  ..!!
मी तर समोरच असते रे तुझ्या नेहमी
पण नकळत का होईना तू पाहत नाही ..!!©  चेतन ठाकरे 

Marathi Kavita : मराठी कविता