Author Topic: चार ओळी  (Read 683 times)

Offline Pravin Raghunath Kale

 • Jr. Member
 • **
 • Posts: 115
 • Gender: Male
 • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
चार ओळी
« on: December 19, 2014, 08:30:13 PM »
Pravin R. Kale:
नकोसं झालय आता
एखाद्यावर जीव लावणं
एखाद्या व्यक्तिची
सतत आठवण काढणं

Prachiti:
जिव असेल जिवात, तोपर्यंतच येईल आठवण,
नाहितर ती बनेल, जखमी ह्रदयाची सुगंधी साठवण

Pravin R. Kale:
ह्रदयात तुझ्या माझ्यासाठी जागा ठेव
आठवण आली तर जाणवून दे

Prachiti:
तुझ्या आवणीत नेहमी ,ह्रदय माझे गहिवरणार,
सदैव तुझ्याच मनी मी स्मरणार

Pravin R. Kale:
तुझ्या मनात, तु आठवशील
तु स्मरशील
पण कधीतरी माझ्या मनातल
भाव ओळखशील..
हा दुरावा कायमचा संपवशील....

Prachiti:
तुझ्या ह्रदयातील आठवणींचा, मनी सदैव ओलावा,
तुझ्या दुराव्याचा आता, प्रत्येक क्षण सरावा 

Pravin R. Kale:
कधी सरतील हे
दुराव्याचे क्षण
कधी जुळून येईल
तुझे माझे मन...

Prachiti:
लवकरच सरेल हा ,तुझा माझा दुरावा,
प्रत्येक क्षण,दोघांनिहि स्मरावा 

Pravin R. Kale:
सरून जावा हा
कायमचा दूरावा
दोन जीवांचा हा
एक जीव व्हावा...


Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: चार ओळी
« Reply #1 on: December 21, 2014, 12:59:12 PM »
good one