Author Topic: कामावरून संध्याकाळी घरी आल्यावर  (Read 631 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 307
  • Gender: Male
कामावरून संध्याकाळी घरी आल्यावर


कामावरून संध्याकाळी घरी आल्यावर,
पाण्याचा ग्लास घेऊन बायको येते.
थांबा कपभर चहा ठेवते म्हणत,
कंबर कसून स्वयंपाक घरात जाते.

आल्या आल्या लगेच माझी दोन मुलं.
पप्पा खाऊ काय आणले म्हणत गळ्याला पडतात,
नेहमी प्रमाणे चॉकलेट घेत,
ते खेळायला निघून जातात.

कामाच्या कचाट्यातून सुटून घरी आल्यावर,
अशी माया रोज पाहतो.
दिवसभराचा सर्व थकवा,
मी क्षणातच विसरून जातो.

@ यल्लप्पा कोकणे
२७/१२/२०१४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर