काही नाती तुटतात
त्यांचा आवाज होत नाही
पण, मन आतून किंचाळ्या
मारल्याशिवाय राहत नाही.
नकोत तुझ्या खोट्या प्रेमभावना
ती निरागस आठवण
माझ्या मोडलेल्या मनाला
तुझ मृगजलासामान सांत्वन.
अडवत असतो मी स्वतःला
तुझ्याकडे येताना
वाट पायात घुटमळत राहते
पाहतो तिला अडगळीतून जाताना.
मोडत असतो मी मनाला माझ्या
जोडताही असतो
जे नियतीने शिकविले मज
तेच त्यास शिकवत असतो.
जगण्याच्या वाटा बदलत गेलो
गुन्हेगार चिखलात रुतत गेलो
दैवाच्या असहाय वेदना
मी सहज झेलत गेलो.
सुनिल संध्या कांबळी.
snl_1408@yahoo.com