Author Topic: ४ ओळया  (Read 1489 times)

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
४ ओळया
« on: December 24, 2009, 09:34:06 AM »
देवळात जाणाऱ्या प्रत्येकाची
झोळी    फाटलेली   असते
देवाने त्यात कितीही सुखं टाकली
तरी मनीषा हि अपुरीच असते.

वादळात सापडलेल्या जहाजाला       
किनाऱ्याचा विचार पडत नसतो
बुडतानाही  कसे  तरता  येईल
याची  शर्त  करत  असतो.

माझ्या    मनाचा    पिंजरा
मला नेहमी मोकळा वाटतो
कारण , मी त्या पिंजऱ्यात
मलाच  अडकलेला  पाहतो .

केव्हातरी   मारायचं   म्हणून
कोणी जगणं सोडून देत नाही
केव्हातरी रडायचं म्हणून कोणी
हसणं   सोडून   देत    नाही.

दुरून   पाहिल्यावर   वाटतं
तार्यांमध्ये किती एकी असते
जवळून पाहिल्यावर कळत
कि ,ते किती एकटे असतात.   

रुद्र कांबळी ........... 8)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: ४ ओळया
« Reply #1 on: December 24, 2009, 12:02:24 PM »
chhan ahet saglyach pan 3 no. vali charoli kalali nahi .......... pinjara mokala hi vatato ani tyat tu svatalach adaklela pahatos ...... donhi kasa shakya ahe?

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: ४ ओळया
« Reply #2 on: December 24, 2009, 12:24:50 PM »
tyasathi man asav lagta

astroswati

 • Guest
Re: ४ ओळया
« Reply #3 on: December 24, 2009, 04:21:22 PM »
chan aahet
i like it