१) हृदयाचे तुकडे
तिने वांरवार केले
मी एकट्यानेच
तिच्यावर प्रेम फार केले
२) जीवनात कधीच पाहू नको वाट कोणाची
जे तुझ्या नशिबात आहे तेच तुला मिळणार आहे
अरे नाती तर वरूनच निर्माण होवून येतात
मग आयुष्यभर कोणाची वाट बघण्यात काय अर्थ आहे

??
३)जीवनात कधीच कोणाल नाही फसवलं
नाही ह्यापुढे फसवणार
हसत आणि हसवत राहायचं आहे नेहमी
कधीच कोणाला नाही रडवणार
४) दुख काय असते
हे विचार त्या समुद्राच्या लाटांना
एकदा का आपटल्या त्या किनाऱ्यावर तर
परत दिसतील तुम्हाला लाबून येताना
५) प्रेमाच्या रस्त्यावरून चालत असतना
प्रयत्न करून सुद्धा नेमकी वात चुकलो
काय झालो हरलोय प्रेमाची बाजी
कसे जगायचं हसत हसत हे तरी शिकलो
६) प्रेमात एकदा खाल्ला धोका
आता प्रेमात पडायची इच्छाच नाहीय
आता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचंय
आता परत रडायची इच्छाच नाहीय
७) जेव्हा प्रेमात तिने फसवलं
वाटल आपल्या हृदयातून तिला कायमची काढून टाकू
मग विचार केला जी गोष्ट तिच्याकडे आहे
त्यावर परत आपला हक्क कसा धाकवू
८) आश्रून मध्ये पाहिजे होती अद्भुत शक्ती
कि निघून जाणारयाना थांबू शकलो असतो
काही व्यक्ती होत्या अश्या हृदयात घर करून गेलेल्या
जणू आयुष्यभरच रडत बसलो असतो.
-विजेंद्र ढगे
vijendradhage@yahoo.com