चारोळ्या
कधी कधी मला प्रश्न पडतो,
तुझ आणी माझं नात कुठंच ?
तुझ्या बोलक्या डोळ्यात लगेच उत्तर सापडत
दीव्याच आणी त्यात जळणाऱ्या अखंड ज्योतीचं
वाटल न्हवत मला
की मी इतकी तुझी होईन
सर्व जगालाच काय पण
स्वतःची ओळख सुद्धा वीसरेन.
हल्ली काय झालाय मला,
माझी ओळखच मला पटत नाही.
प्रत्येक चेहऱ्यात तुझाच चेहरा,
पण आरशातही माझ प्रतीबीम्ब दीसत नाही
दूर गेलेल्या वाटा,
हरवलेले रस्ते.
तुझ्या शीवाय जगणं म्हणजे,
जिवंतपणी मरण असते
---Anagha-------