१)पुढून शर्ट इन करून
मागून तसाच ठेवला होता,
लोकांना वाटले तो
fashion नवीन प्रकार होता
पण पुढून फाटलेला शर्ट
आणि मागून फाटलेली प्यांट लपविण्याचा
तो केविलवाणा प्रकार होता.....
२)सरपणासाठी तोडलेल्या ओंडक्याला
एकदा पालवी फुटली
त्यालाही कळेना
हि जगायची जिद्द आली तरी कुठली?
३) हजारो शब्द वितळवून
चारच ओळी तयार होतात
लोकांना वाटते कवी
उगाचच शब्दांशी खेळतात...
----- Unknown