प्रेम म्हणू की मैत्री म्हणू
काहीतरी आपल नात होत
स्वप्न तरी कस म्हणू
कारण सगळ सत्यात होत.
नात तुझ माझ
अळवावरच्या ठेम्बसार्ख
अळवाच आधार मिळताच मोत्यासारख चमकणार
आणी आधार निसटताच मातीमोल होऊन जाणार
नात तुझ माझ
प्रेमापेक्षा थोड कमी आणी मैत्रीपेक्षा जास्त.
म्हणूनच मला न कधी वाटत
तुला दुरावण्याची खंत.
अनघा