१) मरणप्राय यातना भोगण्यापेक्षा
मरणच यावेसे वाटते
मरण जेव्हा येऊ का विचारते
तेव्हा आणखी थोडे
जगावेसे वाटते.....
२) अर्थ साऱ्या जीवनाचा हाच आहे समजला
समजलो न मी कुणा, कुणी मला न समजला
तोही असो पण गर्व ज्याचा जीवनी मी वाहिला
आजपण त्याही यशाचा अर्थ नाही समजला...
३) अंतरीच्या यातनांना अमरता द्याय खरी
निर्मिला मी 'ताज' माझ्या शायरीचा त्यावरी
स्पर्शुनी 'त्या' शिल्पास तेथे यमुनाच वाहते
यमुनेसवे नयनांतुनी गंगाही येथे वाहते....
४) ऐसे नव्हे कि शायरी या शायरानीच गायली
कमलासवे भ्रमारादिकांनी आधीच होती गायली
पाठ पहिल्या शायरीचे त्यांनी आम्हा दिले
फक्त त्यांच्या गुंजनाला शब्द मी माझे दिले...
५) आसवे नयनात या निर्मिली नसती कुणी
नावही शायरीचे ऐकले नसते कुणी
ज्यांनी दिला दर्द नयनी आसवेही निर्मिली
मी नव्हे,हि शायरी त्यांनीच आहे निर्मिली...
६) शेतीचे शिक्षण देता देता
त्यांनी शिक्षणाची शेती केली
मातीचे शिक्षण दूर राहिले
त्यांनी शिक्षणाचीच माती केली..
७) माणसांनी गंगेत न्हाऊन पापे धुवून घेतली
त्याचेच परिणाम आत्ता बघायला मिळतात
लाखो रुपये खर्चून तिचं माणसे
साफ-सफाईच्या मोहिमा आखतात..
८) निमूट लाटांच्या तडाख्यात
स्व:ताचे अस्तित्व शोधात
आपले स्व:ताचे असे
बरेच काही असते जपण्यासारखे
कवितेच्या वहीत बंदिस्त केलेल्या
आपल्याच गंधासारखे...
------- Unknown