माझ्या मुक्त चारोळ्या
करूदे मला अस काही कि,
जाईन चंद्र-सूर्याच्या संगतीला..
ढाळीन अश्रू तेथे
विरहात पाहून धरतीला..
अज्ञानाच्या जंगलातून चालताना
पदोपदी लुटले गेले..
श्राद्ध करून करून थकले...आता
गरज पडलीये तर बापही दाखवू लागले...
अजाण होतो मी
काट्यातहि गुलाब शोधात होतो
न येणाऱ्या जणू
वसंताची ग्रीष्मात वाट पाहत होतो
मद्ध्यान्नीच्या सूर्यात जणू
पौर्णिमेचा चंद्र पाहत होतो...
कुठवर देणार साथ सावल्या
सूर्य डोक्यावर आला..
गहाण टाकुनी लोक म्हणतात_
विषबाधेच्या भीतीनेच
कृष्णाने केला काला...
_प्रफुल्ल