गोंधळलेलं मन,
थोडं माझं थोडं तिचं।
उतरलं अर्धसत्यात अचानक,
स्वप्न बाळगलेलं उरीचं॥
अंधुकश्या त्या वाटेवर,
पुसटश्या होत्या पाउलखुणा।
कळेना उभयतां मनांना,
नेमक्या या कोणाच्या भावना॥
तिचा होता मार्ग वेगळा,
माझी भलतीच वाट।
चाट पडलो जेव्हा पाहिली,
दोघांनीही एकच पहाट॥
आठवणींचे प्रकाशकिरण चालत आले मंद मंद।
अलगद हळुवार उलगडत गेले,
नात्यांचे हे रेशीमबंध॥
वेड्या खुळ्या सरल मनांना, काहीच कळले नव्हते।
वेगवेगळे मर्ग त्यांनी,नकळत एकमेकांत गोवले होते॥