Author Topic: सविता-सूर्य.  (Read 1005 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
सविता-सूर्य.
« on: April 06, 2011, 08:08:29 AM »
ॐ साई.
मनु निर्मित भूमी जिच्या पुत्रांत,कायम धाडस-शौर्य,
ज्यांच्या विरते पुढे,ओशाळून पडले विनाश-क्रौर्य ;
ज्यांना लाभले गुरु, संत-मुनी,वाल्मिकी,वसिष्ठ,आर्य,
आयुष्य खर्चिले परी, अजरामर आजही त्यांचे देश-कार्य.
प्रेरणा देती, हर भरत पुत्रांस तिन्ही युगी यांचे धैर्य,
राहो प्रकाशित नित्य आयुष्याचा,असाच तेजोमय,सविता-सूर्य.
चारुदत्त अघोर.

Marathi Kavita : मराठी कविता