Author Topic: दिलं आयुष्य जरा जगून पाहू...चारुदत्त अघोर.  (Read 1440 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ॐ साईं.
सुप्रभात माझ्या जिवलगानो...!!!
चला दिलं आयुष्य जरा जगून पाहू,
जीवनाचे टक्के टोणपे थोडे खाऊन पाहू;
कधी ठेचकाळणार्या रस्त्यानवरही जाऊन पाहू,
जखमी हृदया वर कधी मऊ पीस फिरवून पाहू;
कोरड्या डोळ्यां मधून कधी अश्रूही गाळून पाहू,
क्षणभंगुर निसटत्या क्षणांना कधी चाळून पाहू;
थोड्या मनास पटणार्या व्यक्तींना मित्रावून पाहू,
मित्रत्वाचे स्वप्नीत भास-चित्र थोडे रेखावून पाहू;
दिखाऊ हास्य ओठी ठेवून,अंतर्मनी रडून पाहू,
चला दिलं आयुष्य जरा जगून पाहू............!!!!!!!!!!!!
चारुदत्त अघोर.