Author Topic: मनोवेध - ९  (Read 876 times)

मनोवेध - ९
« on: June 19, 2012, 07:50:39 PM »
तुझ्या मनीचा चांदवा
करी प्रेमाची पखरण
माझा शेला धरित्रीचा
करी तयाची साठवण
**************

श्वास ओठांची ती मेळी
वेणुतुन मधुर सुर काढी
तैशी तुझीया नयनांची रे बोली
माझीया मनीची तार छेडी
**************

धरावी आस तुझी
तुझी करावी रे पूजा
पुजनी अर्पावे तुज तन-मन
तन-मन रे देऊन घालवावे मी पण
**************

नुसताच फिरायचा कधी कधी
वारयाला येतो कंटाळा
गिरकी घेतली त्याने की मग
होतो भलताच घोटाळा
**************

जगाची आहे कैसी बघा विपरित रीत
दगडाचा करुनी देव तया करी नमस्कार
आणि मनुष्यरूपी देवालागी लाथा बुक्यांचा भडिमार
**************

दुसरयाच्या जखमेवर मीठ
आपण का बरे चोळतो?
तीच वेळ स्वतःवर आली की
हळूच फुंकर घालतो
**************

तुज आणि माझ असच काही आहे
नाही नाही म्हणताना थोड थोड आहे
आता बोलू मग बोलू अस बरच काही आहे
एवढ सगळ आहे तर मग वेडया वाट कुणाची पाहे
**************

भ्रमर मन तुझे
रुंजे माझीया कमलदळी
पारिजात मन माझे
सडा तुझीया अंगणी
*******

कापूस आणि ढगाची एकदा गुपचुप भेट घडे
त्यांच्यात घडलेले संभाषण चुकून माझ्या कानी पड़े
पृथ्वीवरती वस्त्र होऊनी मी सर्वांचे रक्षण करे
ढग्या, तू थोडा घनघोर बरसुनी त्या सर्वांना भिजवी बरे
*******
« Last Edit: July 04, 2012, 10:37:20 PM by कुसुमांजली »

Marathi Kavita : मराठी कविता