Author Topic: 20 मराठी चारोळया ...to be continued  (Read 792 times)

Offline Ravi Padekar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 146
  • Gender: Male
  • प्रयत्न लिहिण्याचा, स्वतः ला व्यक्त करण्याचा...
20 मराठी चारोळया ...to be continued
« on: September 24, 2015, 04:28:52 PM »
1) अजूनही आठवतो मला
आपला तो पावसातला क्षण
एकाच छत्रीत जाताना,
वेड्यासारखे पाहत होते आपल्याकडे कित्येक जन

2) पाऊस असा रिमझिमता
नकळत तुझ्या दारी यावा
थेंबा थेंबाने तुझ्या चेहर्‍यावर
प्रेमाचा वर्षाव करावा

3) तू दिसलीस की
थोडेसे बोलावेसे वाटते,
तू नसलीस की
मन आतूनच गोठते

4) मला ही वेड लागले
तुझ्यासारखे पाउसात भिजण्याचे,
मग काय सर्दी तापामुळे
शहाण -पणाने डॉक्टर कडे जाण्याचे

5) जे आपल्याला हव असत
ते कधीच आपल्याला भेटत नाही
जे भेटत तेही कधी आपल्याला दूर करावस वाटत नाही

6) इतक्या सहज कुठली
गोष्ट मिळणे आपल भाग्य समजू शकतो
एखादी गोष्ट नाही भेटली तर मग
आपण प्रयत्न न करता दुर्भाग्य का मानू शकतो...

7) मानवाने सृष्टी बदलून
नवीन कशाला करावा देखावा
मेघ राजाने त्यावर बरसून
निसर्गानेच हिरवा शालू पसरवावा...


8)गर्दीतून चालताना
तुझ्या नकळत होणार्‍या स्पर्शाने,
मन भावूक होऊन जायचे
म्हणून कधी boring नाही वाटले
तुझ्या सोबत चालायचे'

9) तू समोर असलीस की,
मन तुलाचा न्याहाळत बसायचे
तू निघून गेल्यावर,
पुन्हा आठवणीशी जगायचे

10) अजून ही जीवन जगत आहे
कारण माझा श्वास आहे तू...
तू जरी माझी नसलीस तरी
माझ पहिलं प्रेम आहे तू...

11) भुलवूनी मन माझे
पाहुनी ते रूप तुझे
कळत नाही वेड आहे प्रेमाचे
की फक्त आकर्षणाचे....

1२) तुझ्या अशा फसवणुकीने
मन घाबरते पुन्हा प्रेम करण्यास
ओळखीच्या माणसाशी देखील
आता तयार नसते बोलण्यास...

 1३) तुझ्या येण्याच्या चाहुलीने
अजून ही तिथेच उभा राहतो
जिथे ब्रेकअप करून तुझ्या जाण्याने
अजून ही तिथेच तुझी वाट पाहतो...

1४) तुझ्या बद्दल लिहायचं म्हटलं की
काहीच सुचतं नाही...
आणि जेव्हा सुचतं तेव्हा
हातात पेन- वही राहत नाही...

1५) तू सोडलेले मोकळे केस
खूप छान वाटतात
वाटतं आताच करावा Prapose
पण शब्द ओठांवर येऊन थांबतात....

16) डोळ्यावरची बट, तिने हळूच मागे सरकवलेल,
अन तिला बघण्यासाठी मन माझ रेंगाळलेल
आयला कुठून डोळ्यात कचरा आला
अन तिच्या कडे बघायचच राहून गेल...

17)ती जाउन खूप दिवस झाले तरी
आसवांसोबत दुख डोळ्यातुनी दाटते
आठवणी जरी विसरलो असलो तरी,
अजूनही प्रत्येक मुलीमधे मन तिलाच शोधत बसते

18) तुला डोळे भरून पाहवस वाटत
पण तू समोर आलीस की डोळेच भरून येतात
अन बोलायचे म्हटले की शब्द सुद्धा मुके होतात...

19)तिच्या सोबतचा प्रत्येक दिवस आठवतोय
आमच्या घडलेल्या भेटींनी,
अजून ही ते क्षण मनात साठवतोय
झोपू न देणार्‍या आठवणींनी

20) आयुष्यभराच्या अश्रुंच
चार ओळीत काय लिहीणार दुख
कितीही दुख आले तरी
नेहमी सुखाकडे असते त्याची पारख...


                                             कवि:-  रवि पाडेकर (8454843034)
                                                      mumbai
« Last Edit: October 05, 2015, 03:33:30 PM by RAVI PADEKAR »

Marathi Kavita : मराठी कविता

20 मराठी चारोळया ...to be continued
« on: September 24, 2015, 04:28:52 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):