तुझं पाऊल अधिक देखणं
की उमटलेली पाऊलखूण?
काय करू मी,असले अवघड प्रश्न सोडवून!
जीवनाच्या रहाटगाडग्यात
करीत असतो बेरीज
सर्व काही असूनसुध्दा
शून्य तुझ्याखेरीज
आज सांगू, उद्या साँगू
साँगायचंच राहून जातं
'अडीच अक्षरे' सांगण्यात
एखाद्याचं आयुष्य जातं
काही क्षणाँचा अबोला
वाटे लोटलं वरीस
वाटे मरण चांगलं
अशा जगण्यापरीस
तू भेटून गेलीस तरी
अजून तुझीच ओढ आहे
तुझी नुसती आठवणही
खरंच, किती गोड आहे.
Unknown