Author Topic: माझ्या Whats app वरच्या 40 चारोळ्या *  (Read 1278 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
[24/03 10:42 am] Love Writer: कितीही बांधले बंधनात
प्रेम तरीही होणार
शरीर जखडता येईल
मन मोकळेच राहणार .
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 10:45 am] Love Writer: मनाचा होतो समुद्र
अन भावनांच्या लाटा
कितीही कर वेगळ्या
तरीही जुळतील वाटा.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 10:48 am] Love Writer: काट्यानंच तर अभय
मिळुन संरक्षण होतं
नाहीतर डाव साधायला
कोणीही तयार असतं.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 10:51 am] Love Writer: सख्या खरं खोट
सोड रे आता
डोळे बंद करुन
जवळ ये आता.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 10:53 am] Love Writer: तेच तर मी म्हणतोय
काट्यातुनच उमलते प्रितवेडी
नाहीतर काय उरणार रे
या प्रेमाची गोडी.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 10:55 am] Love Writer: दुराव्याचा होता जिव्हाळा
जो मनी भिडला
काळजात काटा माझ्या
असा रुतुन बसला.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 10:56 am] Love Writer: एकवअसते फुल
एक असतो काटा
दोघेही जवळच तरी
वेगळ्या त्यांच्या वाटा.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 10:57 am] Love Writer: घाव मनी लागता
ताजी होते वेदना
शब्दांतुन उतरु लागते
मग कवितारुपी भावना.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 10:59 am] Love Writer: दोघांच्या कविता
तशा एकच
तो भावना लिहतो
मी वेदना मांडतो.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 11:00 am] Love Writer: कागदावरुन वाहिलं
मन माझं
कविता बनुन
प्रेम तुझ
शब्दांतुन उतरुन .
कवी-गणेश साळुंखे
[24/03 11:02 am] Love Writer: तुझ्या माझ्या कवितांना
प्रेमाचाच आहे आसरा
नाहीतर आपल्या कवितेत
शब्द आहे का दुसरा.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 11:03 am] Love Writer: कविता माझी
रुसली होती
तिच्यासाठी लिहली
तिलाच पोचली नव्हती.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 11:05 am] Love Writer: आज कसं विपरीतच
सारं घडत होतं
माझंच प्रतिबिंब मी
मला सामोरी दिसत होतं.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 11:07 am] Love Writer: प्रेमच प्रेम होतं
दुसर काय होत
मनात माझ्या तुझ्याविना
दुसरं कोण होतं.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 11:08 am] Love Writer: प्रेमच दिलं असत
तरी खुप होत
एक प्रेमच हव होतं
दुसरं काय पाहिजे होतं.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 11:09 am] Love Writer: प्रेमकवी रे मी
दुसरं काय लिहणार
प्रत्येक शब्दातुन एक
तिलाच तर लिहणार.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 11:11 am] Love Writer: रान प्रेमाच पेटवुन
तर ती गेली
या भोळ्या जीवाला
प्रेमकवी बनवुन गेली.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 11:11 am] Love Writer: माझ्या कवितेला
प्रेमाचाच आधार
अन कवितेला
वेदनांचा आधार .
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 11:12 am] Love Writer: हाडा मांसाचे गोळे
सगळेच इथे रे
पण तरीही त्यांवर
मन भाळतं रे.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 11:14 am] Love Writer: माझ्या प्रेमाच्या नभातुनी
प्रेमवर्षा सारखी होते
अन ती वेडी म्हणे
वा काय बरसात होते.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 11:15 am] Love Writer: नकार अन होकार
हा भाग प्रेमाचाच
काहीही येउ पदरी
तरीही प्रेम ऱाहणार.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 11:17 am] Love Writer: कारण काहीही असो
प्रेम झालं होत
का कसं घडलं
ते विचारायला नको होतं.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 11:18 am] Love Writer: चाळण तर प्रेमात
फक्त ह्रदयाची होते
तिच्या नयनांची गोळी
अशी उर्मी लागते.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 11:20 am] Love Writer: ना ओठ ना जीभ
बोलतात ते डोळे
प्रेमाचे मग पोटात
उठु लागतात गोळे.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 11:22 am] Love Writer: शब्दातुन प्रेम
शब्दांची भावना
शब्दांतुन मांडते
शब्दांची वेदना.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 11:23 am] Love Writer: बोलक्या बाहुल्या
अनेक बघितल्या
पण तिच्यासारख्या
नाही बघितल्या.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 11:24 am] Love Writer: शब्दांनी आधार दिला
मला आज जगण्याचा
नाहीतर तिच्या प्रेमात
पिलेलो मी प्याला विषाचा.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 11:26 am] Love Writer: पाहुणी बनुनच तर
ती आली होती
ह्रदयाच्या घरात ऱाहुन
आठवणीत उरली होती
कवी-गणेश साळुंखे
[24/03 11:27 am] Love Writer: विषय कुठलाही असो
रंगतो तो कट्ट्यावरच
मग तो कट्टा
मनाचा असो वा कॉलेजचा.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 11:29 am] Love Writer: घाव पुसुन पुन्हा
ताजा होतो रे
तिला विसरताच पुन्हा
तिच्या प्रेमात पडतो रे.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 11:30 am] Love Writer: एवढं माञ खर
तु लिहल आहे
कॉलेजचे दिवस ते
आठवणीत उरले आहे.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 11:32 am] Love Writer: एकावरुन दुस-यावर होते
ते प्रेम नाही
कारण प्रेमात इथे
दुसरा शब्दच नाही.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 11:33 am] Love Writer: काळाच्या ओघात
वर्ष सरली
कॉलेजची आठवण
तरीही आली.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 11:35 am] Love Writer: मला तर प्रेम
हजारदा होते
फरक एवढाच
तिच्यावरच होते.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 11:37 am] Love Writer: कॉलेजच जीवन
सुंदर होतं
आठवांच्या झ-यातुन
वाहत होतं.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 11:38 am] Love Writer: भिजुन बघ वेडे
माझ्या प्रेमाच्या पावसात
मग काहीच नाही
उरणार तुझ्या मनात.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 11:40 am] Love Writer: पैशांनी प्रेम होतं
तुला कुणी सांगितलं
पैशांनी फक्त शरीरच
तेवढ विकत घेतलं.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 11:41 am] Love Writer: नाही म्हटले कितीही
प्रेम राहतच रे
फरक एवढाच निमित्त
कारण असतात रे.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 11:42 am] Love Writer: प्रेमवेडे जगुन मरतात
मरुन पुन्हा उठतात
कितीही झाले तरी
प्रेम करायला लागतात.
कवी-गणेश साळुंखे.
[24/03 11:43 am] Love Writer: नशा प्रेमाची चढली
तर उतरत नाही
काऱण उतरायला ती
काय दारु नही.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938