Author Topic: चारोळ्या~बिरोळ्या -1  (Read 394 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 160
चारोळ्या~बिरोळ्या -1
« on: June 12, 2015, 06:26:54 PM »
पाऊस !!!!!!

* पाऊस, तोच पाऊस
तसाच पाऊस,
दरवर्षी येणारा
ओलाचिँब पाऊस!

* मरगळलेल्या मनावर
पडावा एक थंडगार थेँब
अन आठवणीची कुपी
हळूच उघडावी थेट!

* तु आणि पाऊस
दोघांचे नाते अगदी घट्ट
न तुटणारे भावबंध
जसे तुझे नि माझे!

* ढगांची गडगड झाली की
मनात एक धडधड ऊठते
विजेप्रमाणे चमकशील तु ही
असे मनाला उगीच वाटते!

* तुझ्या ओठावर क्षणभर
थांबलेला तो एक थेंब
मोत्याप्रमाणे चमकला
जेव्हा विज कडाऽऽडली !
---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता

चारोळ्या~बिरोळ्या -1
« on: June 12, 2015, 06:26:54 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):