Author Topic: चारोळ्या~बिरोळ्या-12  (Read 390 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 171
चारोळ्या~बिरोळ्या-12
« on: July 04, 2015, 07:10:57 PM »
चारोळ्या~बिरोळ्या-12
                ---राजेश खाकरे
स्वप्न आणि वास्तवाचे
अंतर कापता कापता
संपून जाते आयुष्य
मेळ बसता बसता

कधी कधी स्वप्न ही
वास्तवाहून खूप दूर
नाही हाती लागत काही
दडपूण जातो ऊर

कधी कधी स्वप्नच
वास्तव बदलून टाकतात
 वास्तव मात्र कधी कधी
स्वप्नही चिरडून टाकतात

कधी कधी वाटते
स्वप्ने पाहुच नये
वास्तवाला सोडून
जीणे जगुच नये

स्वप्नाचे रबर ते
खुप ताणता येते
खुप बसतो झटका मना
जेव्हा सोडून दिल्या जाते

स्वप्न आणि वास्तवाची
चालू असते कुरघोडी
स्वप्नाच्या आशेवर
दुःख वास्तवाचे सोडी
--- राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com
(कविता/चारोळी खालील कविचे नाव काढून forward करण्याची तसदी घेऊ नये!!!)

Marathi Kavita : मराठी कविता