Author Topic: चारोळ्या~बिरोळ्या-13  (Read 457 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 167
चारोळ्या~बिरोळ्या-13
« on: July 06, 2015, 10:21:16 PM »
तुझा विरह....
               ---राजेश खाकरे
त्रास होतोय मनाला खुप
मात्र बळेबळे साहतो आहे
माहीत आहे तु येणार नाहीस
तरीही वाट तुझी पाहतो आहे

वेडे मन आहे माझे
सांगितले मानत नाही
कसे समजावणार त्याला
ते दुरावा जाणत नाही

तुझे नसणे मनाला
रीते करुन जाते
तुजवाचुन सखे येथे
काही ना ते उरते

तुझी इतकी सवय झाली
आता दुरावा नको वाटतो
तुझ्याविना क्षण ही
मज दिनासम वाटतो

तुझी आठवण आली की
मन व्याकुळ होऊन जाते
तुझ्या विरहात मग ते
दिनरात झुरत राहते
--- राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com
(कविता/चारोळी खालील कविचे नाव काढून forward करण्याची तसदी घेऊ नये!!!)

Marathi Kavita : मराठी कविता