Author Topic: चारोळ्या~बिरोळ्या-14  (Read 457 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 167
चारोळ्या~बिरोळ्या-14
« on: July 09, 2015, 10:58:18 PM »
कुणीतरी असावं आपलं...

कुणीतरी असावं आपलं
आपल्यावर प्रेम करणारं
डोळ्यातील अश्रु बघुन
हृदयाशी धरणारं

कुणीतरी असावं आपलं
आपल्या आनंदात रमणारं
ओठावरच्या हास्याला
हळूच अलगद फुलवणारं

कुणीतरी असावं आपलं
आपल्या सोबत असणारं
येईल संकट एखादे जेव्हा
मी आहे ना म्हणनारं

कुणीतरी असावं आपलं
भावना आपल्या समजणारं
डोळ्यात एकदा बघुन
मनाचा ठाव घेणारं

कुणीतरी असावं आपलं
सोबत आपल्या चालणारं
अडखळला पाय कधी
हात आपला देणारं

कुणीतरी असावं आपलं
आठवण आपली काढणारं
जिच्याविना विश्व हे
शून्यवत वाटणारं
---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

माझ्या कविता/चारोळ्या इमेज format मध्ये मिळवण्यासाठी whatsapp वर विनंती पाठवा!!!

(टिप:कविता/चारोळी खालील कविचे नाव काढून forward करण्याची तसदी घेऊ नये!!!)

Marathi Kavita : मराठी कविता