Author Topic: चारोळ्या~बिरोळ्या-15  (Read 547 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 171
चारोळ्या~बिरोळ्या-15
« on: July 19, 2015, 12:22:44 PM »
जीवन...
कसं असतं जीवन आमचं
काट्याकुटयांनी भरलेलं
कधी आनंद असतो मनी
दुःखाने कधी सावरलेलं

कुणी भरतो जीवनी आमच्या
अश्रुंची अगणित सुळे
कुणी येऊन फुलवितो कधी
गाली हास्याची ती फुले

कधी मन सुकून जाते
अन कधी तुटून जाते
अशाचवेळी कुणी अवचित
मन आपले जोडून जाते

जगणे कसे आहे खरे
नाही नेमके सांगता येत
चार ओळीत गणित त्याच
नाही बरे मांडता येतं

असलं सोबत कुणी आपलं
आयुष्य हे सुंदर वाटते
नसेल आपलं कुणी तर
जीवन ओझं होऊन जाते
--- राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com


Marathi Kavita : मराठी कविता